सावर रे !

By

थकून गेले लढता लढता,

नैराश्याने पछाडले,

बेंबीच्या देठापासून मी,

विजेसारखी कडाडले.

कुणी न होते श्योत्र्या जागी,

हुंदके देत तरी रडले,

एकटे पाडून, वेड लावून,

अपयश कपटी खद खदले.

हरले, पडले, पुन्हा न उठले,

धडपडले अन तडफडले,

प्रतिबिंबाशी नजर चुकवता,

किती आरसे तडतडले !

पळून जावे दूर कुठेशी,

मनी कितींदा पुटपुटले,

पुढे सरकता नात्या रुपी,

तळ पायी आरसे रुतले.

चिडून काढता तुकडा एक,

गरम रक्त ते सळसळ ले,

तुकड्यातले प्रतिबिंब पाहता,

माझेच मला कळू चुकले !

तुकडे होवो बारीक मोठे,

आरसा ना विसरे दाखवणे,

मोडूनही त्यानी गुण राखला,

दाखवून चेहरे देखणे !

किती ही मोडलो आतून जरी पण,

अश्रूंना तू आवर रे,

पुन्हा उठूनी, धूळ झटकूनी,

कला गुणांना सावर रे !

– केतकी

Posted In ,

Leave a comment